अवतरते मग त्रिकाल राधा..

सूर कोवळे मंतरलेले,
जागवती ती मोहनबाधा,
थरथरणा-या क्षुद्र देही या,
अवतरते मग त्रिकाल राधा ।


'कान्हा..कान्हा..'व्याकुळ गोकुळ,
'ऐकव ऐकव वेणू नादा...'
हृदयस्थाचे होता प्रगटन,
अवतरते मग त्रिकाल राधा ।


तो मुरलीधर, श्याम मनोहर,
सुरासुरांतून करी संवादा,
हर्षोत्फुल्ल बेभान होऊनी,
अवतरते मग त्रिकाल राधा।

नित्यनूतन, नीलश्याम तो,
निळाई वेढून, वर्षवी मोदा,
मोहरणा-या, मार्दवेतून,
अवतरते मग, त्रिकाल राधा ।

(सौ.शैलजा शेवडे)
(२२-४-२०११)

Comments

Popular posts from this blog

मन गोकुळ हे

कसा आहे गं तो?