मुरलीची धून सखी आली कानी..
मुरलीची धून, सखी आली कानी,
मनमोहना भेटण्या, किती अधिर अधिर मनी ।
कशी माळू मी फुले, माझे कुंतल मोकळे,
कसा करू मी शृंगार, वेडे मन बावचळे,
बाई चुगली गं करी, माझ्या पैंजणाचा ध्वनी,
मनमोहना भेटण्या, किती अधिर अधिर मनी ।
जीव होई घायकुता, त्याची ऐकण्या बासरी,
कशी जाऊ मी बाहेरी, येती सरींवर सरी,
काय सांगू मी बहाणा, काय मानतील कुणी,
मनमोहना भेटण्या, किती अधिर अधिर मनी ।
का गं कपिले अशी, हंबरशी पुन्हा पुन्हा,
बोलवतो तुला सुध्दा, का गं वेणूनादे कान्हा?
राघू, मैंना, सा-यांनाच जायचे गं वृंदावनी,
मनमोहना भेटण्या, किती अधिर अधिर मनी ।
(सौ. शैलजा शेवडे)
(२२-४-२०११)
मनमोहना भेटण्या, किती अधिर अधिर मनी ।
कशी माळू मी फुले, माझे कुंतल मोकळे,
कसा करू मी शृंगार, वेडे मन बावचळे,
बाई चुगली गं करी, माझ्या पैंजणाचा ध्वनी,
मनमोहना भेटण्या, किती अधिर अधिर मनी ।
जीव होई घायकुता, त्याची ऐकण्या बासरी,
कशी जाऊ मी बाहेरी, येती सरींवर सरी,
काय सांगू मी बहाणा, काय मानतील कुणी,
मनमोहना भेटण्या, किती अधिर अधिर मनी ।
का गं कपिले अशी, हंबरशी पुन्हा पुन्हा,
बोलवतो तुला सुध्दा, का गं वेणूनादे कान्हा?
राघू, मैंना, सा-यांनाच जायचे गं वृंदावनी,
मनमोहना भेटण्या, किती अधिर अधिर मनी ।
(सौ. शैलजा शेवडे)
(२२-४-२०११)
Comments