सुंदर हो जगणार....

कोसळू दे आकाश धरेवर,

खुशाल येवो प्रलय भयंकर,

भिती दाखवो, वादळवारे,

लुप्त होवू दे, नभीचे तारे,

जीवनगाणे तरीही, आम्ही आनंदे गाणार,

सुंदर हो जगणार, आम्ही सुंदर हो जगणार ।

जीवन भासे कधी नंदनवन,

असेल कधी ते जरी रणकंदन,

माणसातल्या देवपणाची,खात्री ती धरणार,

सुंदर हो जगणार, आम्ही सुंदर हो जगणार ।

कितीही आल्या जरी अडचणी,

मार्ग काढू हो, तरी त्यातूनी,

तो पाठीशी राम उभा जर,

भीती कसली असणार?

सुंदर हो जगणार, आम्ही सुंदर हो जगणार ।

(सौ शैलजा शेवडे)

Comments

veerendra said…
wa mastach .. blog suru kelela sangitala ka nahit ?
कविता छान आहे तुमची.
मुक्क्तपीठ वर मी ’अनुबंध’ विषयी लिहिले. त्यावरील तुमची प्रतिक्रिया मला आवडली.
माझा ब्लॉग कृपया पहा :
http://visitrajmachi.blogspot.com

Popular posts from this blog

मन गोकुळ हे

कसा आहे गं तो?