नको रे असे गीत सामोरी आणू....

नको रे असे गीत सामोरी आणू,
नको रे अशी तार गीतात ताणू,
आताच लागे, कुठे सावरु मी,
नको वेदनेचे, पुन्हा ताट आणू ।
नको आठवू पुन्हा त्या क्षणांना,
किती कोवळ्या भावना जाण ना,
शब्दांनी त्यांना स्पर्शू नको रे,
कौमार्य त्यांचे सांभाळू या ना ।
नको आरसा आणू माझ्यासमोरी,
नको वाचू वादळे घोंघावणारी,
भीती वाटते माझीच रे मला ती,
कोण ती लपूनी बसे अंतरी ।
असू दे दुरावा, नको खंत त्याची,
जरा आवरूया ओढ ती मनाची,
किती टोचरे ते तरी सत्य आहे,
अरे तीच ओळख, आहे स्वतःची ।

(सौ. शैलजा शेवडे)

Comments

Shailajataai,

किती कोवळ्या भावना जाण ना,
शब्दांनी त्यांना स्पर्शू नको रे,
कौमार्य त्यांचे सांभाळू या ना ।

...khup ch Apratim oli aahet ya.

..nitaantsundar kavita.
tumachya kahi kavita mala awadalya mhanun mi mazya scrapbook madhe copy kelya ahet.. tumachi parawangi na gheta.. sorry.. pan tya wachane sodun baki kahi upyog karanar anhi hi khatri balaga... hi tyapaiki ek.. sunder...

Popular posts from this blog

मन गोकुळ हे

कसा आहे गं तो?