असा खेळले भातुकलीचा खेळ साजरा बाई गं,

असा खेळले भातुकलीचा खेळ साजरा बाई गं,
लुटुपुटीच्या खेळामध्ये, जीव ओतला बाई गं ।
चूलबोळकी चार मांडली, घरकुल किती सजले गं,
खाऊ मोजका होता तरीही, किती जिन्नस केले गं ।
खोटी खोटी झाले आई, ऐट किती ती रमले गं,
पदर खोचूनी कामे केली, नंतर लटके दमले गं ।
पुन्हा नवा तो डाव मांडिला, राणी आता झाले गं,
तेच सवंगडी हुकूम झेलती, तोरा माझा चाले गं ।
किती डाव ते पुन्हा मांडिले, किती दंगले बाई गं,
किती जन्म ते आले गेले, तरीही खेळी रमले गं,
विसरून गेले खेळ खेळता माझी ओळख बाई गं,
’बाळे आता पुरे खेळ तो’, दटावते मज आई गं ।

(सौ.शैलजा शेवडे)

Comments

किती जन्म ते आले गेले, तरीही खेळी रमले गं,
विसरून गेले खेळ खेळता माझी ओळख बाई गं,

...Atishay sundar

..khelata khelata satya saangitlet tumhi.

Popular posts from this blog

मन गोकुळ हे

कसा आहे गं तो?