दुर्गे शक्तिरूपे
दुर्गे शक्तिरूपे
.
समर्थांनी ‘शक्तिरूपे जगन्माता वर्तते जगदंतरी’ असे म्हणत देवीस्वरुपाची व्यापकता स्पष्ट केली आहे.
नवरात्रीत देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते.दुर्गा म्हणजे दुःख दूर करणारी..तिची नऊ रूपे वर्णन करणारी कविता मी केली आहे.
.
भावभक्तीने भजितो तुजला, दुर्गे, शक्तीरूपे,
करीन जप तव नामांचा मी, निश्चित गूढ रूपे |
.
शैलपुत्री तू, वृषारूढा, प्रथम तुला नमितो,
शूलधरा, तू, अनंतशक्ती, कृपा तुझी इच्छितो |
.
ब्रह्मचारिणी, तव करकमली, कमंडलू अक्षमाला,
तेजोमयी तू सर्वसिद्धी दे, निश्चय दे आम्हाला |
.
चंद्रघंटा सिंहारुढा,खड्गधारी, स्वर्णमयी,
अर्धचंद्र शिरी घंटाकारी, दशभूजा शुभमयी |
.
कुष्माण्डा तू, ब्रह्मांडाला हास्यातून निर्मिसी,
अष्टभुजा, सिंहारुढा, व्याधी नष्ट करसी |
.
स्कंदमाता, सिंहासनी तू, स्कंदासह बसशी,
शुभ्रवर्णा, चतुर्भुजा तू, यश आम्हां देसी |
.
कात्यायनी तू पापहारिणी , अमोघफलदायिनी,
अभय देसी, भक्तांना तू, शार्दुलवरवाहिनी |
.
कालरात्री,तू गर्दभवाहिनी ,त्रिनेत्रा कालिके,
रूप भयंकर, परी भक्तांना भयमुक्त करते |
.
महागौरी तू अष्टवर्षा, श्वेता, श्वेतांबरा,
पूर्वसंचित पाप हरसी, सौम्या, अश्वारूढा |
.
सिद्धीदात्री, हाती तव,गदा,पुष्प,शंख चक्र ,
पूर्ण करसी कामना, हो परमसिद्ध साधक |
.
साधक नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून उपासनेला , साधनेला प्रारंभ करतात. पहिल्या दिवशी मूलाधार चक्रात आपल्या मनाला स्थिर करतात. शैलपुत्रीला आवाहन करतात. दुस-या दिवशी स्वाधिष्ठान चक्रात स्थिर करणा-यावर ब्रह्मचारिणी या रुपाची कृपा होते. तिस-या दिवशी दुर्गेच्या तिस-या रूपाचे, शक्तीचे, चंद्रघंटेचे साधकाकडून पूजन होते. त्याचे मन मणिपूर चक्रात प्रविष्ट होते.त्याला दिव्य आवाज येऊ लागतात. चौथ्या दिवशी कुष्माण्डा रुपाची उपासना केली जाते. साधकाचे मन अनाहत चक्रात स्थिर होते. पाचव्या दिवशी 'स्कंदमाता' या रुपाची पूजा होते. साधकाचे मन विशुद्ध चक्रात स्थिर होते.सहाव्या दिवशी कात्यायनी या रूपाचे पूजन, त्यामुळे आज्ञाचक्रात मन स्थिर. सातव्या दिवशी कालरात्रीचे पूजन मन सहस्रार चक्रात स्थिर...सर्व पापे येथून पुढे धुतली जातात. आठव्या दिवशी महागौरीचे पूजन , नवव्या दिवशी नवव्या रूपाचे, सिद्धीदात्रीचे पूजन..साधकाला अष्टसिद्धी प्राप्त होतात....
.
(सौ. शैलजा भा. शेवडे)

Comments