कुंतीने केलेले कृष्ण स्तवन

नमस्कार हे आदिपुरुषा, परमेशा कृष्णा,
.
सर्वव्यापी, तू  अगम्य असशी पुरुषोत्तम कृष्णा  |१८|
.

.मायामोहित बद्ध आम्ही, तू अधोक्षजा अव्यया,
.
कसे ओळखू तुला नटवरा,मूळ तुझ्या स्वरूपा |१९|
.
.
परमहंस ते ऋषी जाणती, भक्तीने तुजला,
.
ज्ञानभक्तिहीन, आम्ही स्त्रिया रे कसे पाहणे तुला  |२०||
.

.नमन तुला रे, देवकीसुता, वासुदेव कृष्णा,
.
पंकजनाभा, पंकजनेत्रा, गोविंदा नंदना |२१| २२|
.
.
हे हृषीकेशा,देवकीला तू कारामुक्त केले
.,
आम्हालाही आपत्तीतून कितींदा सोडविले |२३|
.
.
लाक्षागृह, तो विषप्रयोगही वनवासही झाला
.
युद्धातही अन  ब्रह्मास्त्रातून वाचविले आम्हां |२४|
.
.
जिथे तिथे, अन पुन्हा पुन्हा ती संकटं बहु येवो,
.
व्याकुळतेने तुला स्मरो, अन दर्शन तव लाभो |२५|
.

.कुळधन विद्ये मदांध त्यांना, तू न कधी दिसतो,
.
कोणीही नाही ज्यांना तुजविण त्या दर्शन तू देतो |२६|
.
.
नमस्कार हे अकिंचना रे, परमात्म्या कृष्णा,
.
कैवल्याचा पती तूच हे शांता, आत्मारामा |२७|
|
.
.
जाणे मी तू, अनादी ईशान, कालरूप विभुती,
.
समभावाने विश्वी नांदसी, कोणी न जाणिती |२८|
.
.
श्रीकृष्णा , तू परमात्मा, तरी जगी जन्म घेसी,
.
जरी अकर्ता,कर्म करुनी लीला दाखविसी |३०|
.
.
खोडी करता, माय यशोदा, हाती दोर घेई,
.
भेदरुनी तू रडता, काजळ गालावर येई,
.
भय ज्याचे काळालाही , भयभीत कसा होई,
.
रूप तुझे ते स्मरुनी  कृष्णा, मुग्ध अजून होई   ||३१|
.
.
कोणी म्हणती,अजन्म असुनी,
.

.हे विश्वेशा, विश्वात्म्या  रे , विश्वमूर्ती कृष्णा,
.
आप्तांचे मम स्नेहपाश दृढ, तूच तोड कृष्णा |४१|
.
.
हे मधुपती रे, तुझ्याविना ना अन्य विषय येवो,
,
गंगौघासम, प्रबळ भक्ती मम तुझ्यात लीन होवो |४२|
.
.
.
सौ. शैलजा शेवडे


.


.



Comments

Popular posts from this blog

मन गोकुळ हे

कसा आहे गं तो?