मन पाखरू पाखरू

मन पाखरू पाखरू, घेई अनोळखी तान
रामप्रहरात आले, नकळत आत्मभान |
.
जणु बहरला चाफा, गंधाळला अणुरेणू,
मन कालिंदी कालिंदी, कान्हा वाजवितो वेणू ।
.
काही गवसले वाटे, शब्दातीत नादमय,
मन आनंद आनंद, सारे जग कृष्णमय ।
.
कुठे आहे दूरपणा, जाणवतो त्याचा श्वास,
मन चपळ चपळ , करे आगळा प्रवास ।
.
नाही वेगळेपणा तो, तुझे माझे काही नाही,
मन आभाळ आभाळ, सामावले सारे काही ।
.
.
(सौ. शैलजा शेवडे)

Comments

Popular posts from this blog

मन गोकुळ हे

कसा आहे गं तो?