नमस्कार माझा तया ईश्वराला

नमस्कार माझा तया ईश्वराला,
शिशुरूप ज्याचे लुभावे मनाला,
कसा धावतोहे, झुला कुंडलाला...
यशोदा बळेही धरी बालकाला ।



रडे, घाबरूनी, पुन्हा नेत्र चोळे,
किती सानुल्याला येती उमाळे,
गळा मोतीयांची कशी माळ हाले,
अहा भक्तीने, दामोदरा बांधियेले ।


अती आनंद देत या बाललीला
जणू तो इशारा, ज्ञानी जना्ला,
पहा, जिंकते प्रेम दामोदराला.
नमस्कार माझा तया ईश्वराला ।


नको मोक्ष, मुक्ती, नसे कामना ही,
न वैकुंठ प्राप्ती, नको अन्य काही,
रहा बालरूपे, हृदयात माझ्या,
असे हीच इच्छा, असे प्रार्थनाही ।
..........................................
.........................................
(सौ. शैलजा शेवडे)

Comments

Popular posts from this blog

मन गोकुळ हे

कसा आहे गं तो?