रामनामाची शिदोरी
का भुकेजूनी फिरशी, मागसी का चार दारी,
रे तुझ्यापाशीच आहे, रामनामाची शिदोरी ।
विसरलासी का तुझी रे, सुकृताची ती तिजोरी,
गूढ मायेतून शोधी, रामनामाची शिदोरी ।
वेदनेचा अंत नक्की, तो कृपाळू धाव घेई,
चाख आनंदे चवीने , रामनामाची शिदोरी ।
भूकही रे आगळी ती, जाण हे तू, शांतचित्ती,
भागवाया, एक केवळ, रामनामाची शिदोरी ।
रे दिली ती, चोच ज्याने, तोच प्रेमे, घास चारी,
ठेव श्रध्दा, अंतरी ती, रामनामाची शिदोरी ।
वाटण्याने वाढते ही, तृप्त ती होतील सारी,
जोडते सा-या मनांना, रामनामाची शिदोरी ।
(सौ. शैलजा शेवडे)

Comments