कशासाठी....

लढायाचे, मनाशीही, जनाशीही, कशासाठी?
सुखाच्या त्या, तरी गोष्टी, रचायाच्या कशासाठी?

नकाराचे, अभावाचे, उतारे हे, जरी हाती,
चितारावे, विनोदाचे, फवारे ते, कशासाठी?

हिशोबाच्या उठाठेवी, जमा नाही, कुठे काही,
वह्या सा-या, रकान्यांनी, भरायाच्या कशासाठी?

विझू जाती, दिवे सारे, भिती दाटे, उरी पोटी,
झरोक्याला, प्रकाशाच्या, हसायाचे, कशासाठी?

खुडायाच्या कळ्या सा-या, मुक्या त्याही, पुजेसाठी,
जरा कोठे, दुखे काही, रडायाचे, कशासाठी?

जुन्या रेशीम धाग्याला, मना ठावे किती गाठी
तरी गुंतायचे पुन्हा, झुरायाचे, कशासाठी?

(सौ. शैलजा शेवडे)

Comments

Popular posts from this blog

मन गोकुळ हे

कसा आहे गं तो?