काय झाले ते कळेना...
’योग नव्हता, ’ कोणि म्हणती, दैवलीला आकळेना,
हात हातातून सुटला, काय झाले ते कळेना ।
दोष तो नव्हता कुणाचा, कारणे काहीच नव्हती,
डोकवावा का दुरावा, काय झाले ते कळेना ।
मौन झाकोळून टाकी, पूल आहे मोडलेला,
बेट एकाकी कधीचे, काय झाले ते कळेना ।
टोकराव्या वाटते त्या, गूढ खपल्या वेदनेच्या,
स्तब्धता अंतर्मनाची, काय झाले ते कळेना ।
तोलती अश्रु कधीच्या, पापण्या हट्टी किती त्या,
धुमसता ज्वालामुखी हा. काय झाले ते कळेना ।
(सौ. शैलजा शेवडे )

Comments