रास खेळतो रासबिहारी
मुरली घेऊन येई मुरारी,
मोहरलेली रात्रच सारी
अमृतमय ते चंद्र चांदणे,
रास खेळतो रासबिहारी ।
गोपी लहरती लकेर घेती,
छुनछुन छननन नाद घुमविती,
मोहन मोहित सारी सारी,
रास खेळतो रासबिहारी ।
वृताकार ते नृत्य मनोहर,
केंद्रस्थानी मधुमिलिंद नटवर
भावप्रगल्भा, त्या परिघावरी.
रास खेळतो रासबिहारी ।
वेणुध्वनीने पुलकीत वारा,
ताल, रस लय, अबाध धारा,
कृष्ण समर्पित गोपी नारी,
रास खेळतो, रासबिहारी ।
हरेक गोपीसवे नाचतो,
प्रतिबिंबाशी जणु खेळतो,
अनंतरुपे लीलाधारी,
रास खेळतो रासबिहारी ।
मेघमंडळी वीजा चमकती,
चपल यौवना गोपी नाचती,
कृष्णस्पर्शे हर्ष मुखावरी,
रास खेळतो, रासबिहारी ।
आनंदाची होय परिसीमा,
मेघःश्यामल तो परमात्मा,
मिलनाच्या मग उठती लहरी,
रास खेळतो, रासबिहारी ।
(सौ. शैलजा शेवडे)
मोहरलेली रात्रच सारी
अमृतमय ते चंद्र चांदणे,
रास खेळतो रासबिहारी ।
गोपी लहरती लकेर घेती,
छुनछुन छननन नाद घुमविती,
मोहन मोहित सारी सारी,
रास खेळतो रासबिहारी ।
वृताकार ते नृत्य मनोहर,
केंद्रस्थानी मधुमिलिंद नटवर
भावप्रगल्भा, त्या परिघावरी.
रास खेळतो रासबिहारी ।
वेणुध्वनीने पुलकीत वारा,
ताल, रस लय, अबाध धारा,
कृष्ण समर्पित गोपी नारी,
रास खेळतो, रासबिहारी ।
हरेक गोपीसवे नाचतो,
प्रतिबिंबाशी जणु खेळतो,
अनंतरुपे लीलाधारी,
रास खेळतो रासबिहारी ।
मेघमंडळी वीजा चमकती,
चपल यौवना गोपी नाचती,
कृष्णस्पर्शे हर्ष मुखावरी,
रास खेळतो, रासबिहारी ।
आनंदाची होय परिसीमा,
मेघःश्यामल तो परमात्मा,
मिलनाच्या मग उठती लहरी,
रास खेळतो, रासबिहारी ।
(सौ. शैलजा शेवडे)
Comments