नका घेऊ हो नाव मुळी त्या मायावी कृष्णाचे ।
नका ऐकू हो, नाव सुध्दा त्या, मायावी कृष्णाचे,
असा लावतो नाद, की नुरते स्मरणही संसाराचे ।
एकवार जुळता नाते, त्या कमललोचनाशी,
तोच आप्त, सखा वाटतो, फिकी नाती इतरांशी ।
अर्थ बदलती, हव्यासाचे, उर्मी जगण्याची तीही,
श्यामसुंदरावाचून गमे सुख, अन्य कुठेही नाही ।
प्रपंचातून बने विरक्त, तोडी मायापाश,
कृष्ण जल, भूमी कृष्ण, कृष्णच ते आकाश ।
कृष्ण कथा, ते एकच गाणे, वेड तेच जीवाचे
नका घेऊ हो नाव मुळी त्या मायावी कृष्णाचे ।
( सौ. शैलजा शेवडे)

Comments