प्रणाम तुज शारदे...!

प्रणाम तुज शारदे, ज्ञानदे, प्रणाम तुज शारदे.........!
शुभ्रवसनावृता कमलिनी, सरस्वती ज्ञानदे..!

तू शब्द कंठातला, तू अर्थ शब्दातला,
आनंद अर्थातला.. मूळ चारी वाणीचे,
प्रणाम तुज शारदे, ज्ञानदे, प्रणाम तुज शारदे..।

तू नाद प्रणवातला, तू स्वरा, तू चित्कला,
वीणाधारिणी, जीवनी, आनंदघन वर्षू दे ।
प्रणाम तुज शारदे, ज्ञानदे, प्रणाम तुज शारदे ।

तू ज्ञानियांची निवृती, समाधीतून आकृती,
परब्रह्माच्या स्वरुपा, साररूप जाणणे, ज्ञानदे,
प्रणाम तुज शारदे, ज्ञानदे, प्रणाम तुज शारदे ।

(सौ. शैलजा शेवडे)

Comments

SANJAY said…
शैलजाताई आपण फार छान लिहिता, ही ईश्वराची देणगी आहे..असच चालू ठेवा.
संजय प्रधान

Popular posts from this blog

मन गोकुळ हे

कसा आहे गं तो?