कर माफ तू स्वतःला,

कर माफ तू स्वतःला, त्रागा अपार झाला,
ग्रहणात सूर्य होता, हा खेद फार झाला ।

चुकतात पावलेही, मोहावल्या क्षणांना,
अधिकार तो चुकांचा, हाही प्रकार झाला ।

पुनवेस चांद येता, झेपावतात लाटा,
अडवू शके कुणी का? नाही विकार झाला ।

दुषणे किती मनाला, ही खंत रे किती का?
उघडून टाक दारे, अंधार भार झाला ।

अपराध क्षालनाचा बाऊ किती करावा,
नियतीस मान्य होता, हा तोच वार झाला

( सौ. शैलजा शेवडे )

Comments

Popular posts from this blog

मन गोकुळ हे

कसा आहे गं तो?