हा किनारा कोणता...
जायचे होते कुठे ते, हा किनारा कोणता,
दाविली ज्याने दिशा ही, ध्रुव तारा कोणता ।
काय ते आभास सारे, कोण हाका मारते,
दूर नेई ओढूनी जो, तो पुकारा कोणता?
रात्र आहे पौर्णिमेची, भारलेले झाड मी,
ते स्मरावे आपणाला, तो उतारा कोणता?
हात लावाया पळावे, लांबलेल्या सावल्या,
आस जी जीवास लागे, तो इशारा कोणता?
संपलेसे वाटते हे, प्रेममाया मोहही,
वेढतो तेव्हाच देहा, हा शहारा कोणता?
ईश्वराला त्या स्मरावे, किर्तनी, मौनातही,
आणतो कोलाहलाला, रानवारा कोणता?
(सौ. शैलजा शेवडे)
दाविली ज्याने दिशा ही, ध्रुव तारा कोणता ।
काय ते आभास सारे, कोण हाका मारते,
दूर नेई ओढूनी जो, तो पुकारा कोणता?
रात्र आहे पौर्णिमेची, भारलेले झाड मी,
ते स्मरावे आपणाला, तो उतारा कोणता?
हात लावाया पळावे, लांबलेल्या सावल्या,
आस जी जीवास लागे, तो इशारा कोणता?
संपलेसे वाटते हे, प्रेममाया मोहही,
वेढतो तेव्हाच देहा, हा शहारा कोणता?
ईश्वराला त्या स्मरावे, किर्तनी, मौनातही,
आणतो कोलाहलाला, रानवारा कोणता?
(सौ. शैलजा शेवडे)
Comments