सावळ्याच्या ठायी..
नको नको मज, मोक्ष मुक्ती काही,
सावळ्याच्या ठायी, चित्त राहो ।
भागली भागली, हौस संसाराची,
ओढ सावळ्याची, लागी मना ।
आहे असे वाटे, देह माझा येथे,
मन मात्र तेथे, पंढरीला ।
भक्तीचा कल्लोळ, वैष्णवांची दाटी,
चंद्रभागेकाठी, धावे मन ।
विटेवरी उभा, कटीवर कर,
नितांत सुंदर, रुप त्याचे ।
बोलावून घे रे, रुख्मिणीच्या राया,
आयुष्य हे वाया, जाते वाटे ।
(सौ. शैलजा शेवडे)
सावळ्याच्या ठायी, चित्त राहो ।
भागली भागली, हौस संसाराची,
ओढ सावळ्याची, लागी मना ।
आहे असे वाटे, देह माझा येथे,
मन मात्र तेथे, पंढरीला ।
भक्तीचा कल्लोळ, वैष्णवांची दाटी,
चंद्रभागेकाठी, धावे मन ।
विटेवरी उभा, कटीवर कर,
नितांत सुंदर, रुप त्याचे ।
बोलावून घे रे, रुख्मिणीच्या राया,
आयुष्य हे वाया, जाते वाटे ।
(सौ. शैलजा शेवडे)
Comments