जो तो पळून जातो, ऐकून ही कहाणी,
जो तो पळून जातो, ऐकून ही कहाणी,
मेघात पांढ-या त्या कोठे असेल पाणी?
पाटी हवीच कोरी, सर्वांस त्या लिहाया,
खोडू किती, कशाने, जात्याच मी अडाणी
तो घाव काळजाचा, विसरायचा मलाही,
प्रत्येक तो, पुन्हा का, करतो अशी पहाणी?
आशा कधी मनाला, खंबीर साथ आहे,
पण शब्द बेगडी ते, नुसती मधाळ वाणी ।
खोटी सहानुभूती, आश्वासने नकोशी,
या हास-या उषेने, गावी नवीन गाणी ।
(सौ. शैलजा शेवडे)
मेघात पांढ-या त्या कोठे असेल पाणी?
पाटी हवीच कोरी, सर्वांस त्या लिहाया,
खोडू किती, कशाने, जात्याच मी अडाणी
तो घाव काळजाचा, विसरायचा मलाही,
प्रत्येक तो, पुन्हा का, करतो अशी पहाणी?
आशा कधी मनाला, खंबीर साथ आहे,
पण शब्द बेगडी ते, नुसती मधाळ वाणी ।
खोटी सहानुभूती, आश्वासने नकोशी,
या हास-या उषेने, गावी नवीन गाणी ।
(सौ. शैलजा शेवडे)
Comments