तू हिंदू..तू हिंदू...!
भ्रमित होऊनी, इकडे तिकडे का धाविसी, रे बंधू,
कस्तुरीमृग का बनून शोधिसी, दिव्य सुगंधा रे बंधू,
तो ठेवा रे, आनंदाचा, तुझ्याच पाशी रे बंधू,
जाणून घे ते, मूळ तुझे रे, तू हिंदू, तू हिंदू...!
वृथा कुणाला, मनीची तळमळ, सांगसी का तू, रे बंधू,
तो करूणाकर, राम तुझ्या, पाठीशी असता, रे बंधू,
विसर तुझ्या त्या चिंता सगळ्या, आनंदच केवळ रे बंधू,

तो रणकर्कश राम, पराक्रमी, मनी सदा असता बंधू,
का भिऊन वागसी, पडते घेसी, निष्कारण तू हे बंधू,
तो राम, तुझ्या चित्तामधला, बाहूत प्रगटू दे, हे बंधू,
का विसरसि, पुन्हा पुन्हा रे, सिंहाचा तू, छावा हिंदू ।
(सौ. शैलजा शेवडे)

Comments