पहिले पाढे पंचावन्न

वाटलं होतं आतातरी, शहाणे झालो आपण,
कसचं काय, कसचं काय, परत पहिले पाढे पंचावन्न ।

घाबरून होते गेले, काळाचं महत्व जाणले,
चार दिवस बरी वागले, परत, पहिले पाढे पंचावन्न ।

माणसांची किंमत कळली, भांडणंही मिटली,
चार दिवस गोडीगुलाबी, परत पहिले पाढे पंचावन्न !

विषयातली गोडी गेली, विरक्तीही आली,
चार दिवस रामनाम, परत पहिले पाढे पंचावन्न ।

मोक्षाची लालूच झाली, मरणाची भीती झाली,
चार दिवसांचे शहाणपण, परत पहिले पाढे पंचावन्न ।

(सौ.शैलजा शेवडे)

Comments

Popular posts from this blog

मन गोकुळ हे

कसा आहे गं तो?