कलहांतरिता..
अष्टनायिका.
.कलहांतरिता..
मी न जे उच्चारीले, ते शब्द माझे ऐक ना रे !
आक्रंदते चुपचाप मी, तू थांब ना रे, थांब ना रे ।
काय हे आक्रीत झाले, जे कधी चिंतिलेच नव्हते,
तो होता रुसवा क्षणिक, जाण ना रे, थांब ना रे ।
या इ थेच किती काळ मी,वाट तुझी रे पाहिली,
तो ताण रे शब्दात आला, मान ना रे, थांब ना रे ।
किती होते सांगायचे, आणि ते ऐकायचे,
मोहरले, होते फुलले, ऐक ना रे, थांब ना रे ।
किती भास ते तुझे, किती फसले, किती हसले,
आलास तू मग भांडले, निष्कारण रे, थांब ना रे ।
किती दिल्या जखमा तुला, घणाचेच घाव रे,
त्या शब्दां आठवून घायाळ मी रे, थांब ना रे ।
नको जाऊस रागावून, एकदाच बघ वळून,
काळीज हे तुटते रे, थांब ना रे, थांब ना रे ।
(सौ. शैलजा शेवडे)

Comments