स्मर रामा रे
ऋतुचक्राला घुमवित घुमवित, काळ चालला खेळत खेळत,
क्षण क्षण जवळी आणी यमदूत, किती दवडसी वेळ फुका रे,
भ्रमित मना हे जाण जाण रे, नको परत त्या व्यर्थ चुका रे,
रामाविण तुज कोण दुजा रे, स्मर रामा रे, स्मर रामा रे ।
..
वाद विवाद बाष्कळ चर्चा, गप्पा गोष्टी कुण्या गावच्या,
कपोलकल्पित दूरदूरच्या, परी न करसी पूजा अर्चा,
भरकटसी का पुन्हा पुन्हा रे, अशाश्वतच हे बाकी सारे,
रामाविण तुज कोण दुजा रे, स्मर रामा रे, स्मर रामा रे ।
.....
नात्यांमधली गोडी फसवी, कधी अचानक धागे उसवी,
क्षणभंगुर या आयुष्याचे, येणे जाणे मनात ठसवी,
माझे माझे करशी का रे, खरोखरी हे मृगजळ सारे,
रामाविण तुज कोण दुजा रे, स्मर रामा रे, स्मर रामा रे ।
.
.
( shailaja shevade )
.....
Comments