उत्तरायण
उत्तरायण
.
अग्निर्ज्योतिरहः शुक्लः षण्मासा उत्तरायणम्।

तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जनाः।।8.24।।
भगवद्गीतेतला ८ व्या अध्यायातला २४ वा श्लोक आहे. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात,
'अग्नी, ज्योती म्हणजे ज्वाळा, दिवस, शुक्लपक्ष , उत्तरायणाचे ६ महिने,यात मेलेले ब्रह्मवेत्ते लोक मेल्यावर ब्रह्मास पोचतात.
.
इच्छामरणी भीष्माचार्यांनी शरपंजरी पडलेले असतांनाही उत्तरायणाची वाट का पहावी..मला खरोखरच प्रश्न पडला होता. उत्तरायणात मृत्यू पावल्याने काय होते, तर मोक्ष मिळतो. जन्ममृत्यूच्या फे-यातून मुक्ती मिळते. कसला अग्नी, कसली ज्योत..काही कळत नव्हते. पण माझ्या मदतीस ज्ञानेश्वरी आली. .
ज्ञानेश्वर महाराज सांगतात,
एथ अग्नी हे पहिले पायतरे।ज्योतिर्मय हे दुसरे।
दिवस जाणे तिसरे।चौथी शुक्लपक्ष।।८-२२३
आणि सामासी उत्तरायण।ते वरचील गा सोपान।
येणे सायुज्यसिद्धिसदन।पावती योगी।।८-२२४
अग्नी -शुद्ध ज्ञान
दिवस-सावधानता
उत्तरायण-सज्जनता
ज्योति-भक्ती
शुक्ल पक्ष-सदाचरण
हे असेल तर अर्चिरामार्गप्राप्त होऊ शकत.
.
त्यात लिहिले आहे, भगवद्रूप होणे आणि जन्ममरणाच्या फे-यात सापडणे, ही दोन्ही ठराविक मरणवेळेच्या आधीन आहेत. मृत्यू समय आल्यावर शेवटी पंचमहाभूते आपापल्या वाटेने निघतात.

.ब्रह्मस्थितीला प्राप्त केले असता मरण काळ प्राप्त झाला असतांना बुद्धीला भ्रम गिळत नाही.स्मरणशक्ती आंधळी होत नाही.आणखी मन मरत नाही. याप्रमाणे हा सर्व इंद्रियसमुदाय मरणसमयी टवटवीत असतो.हा त्याचा सावधपणा शेवटपर्यंत टिकणे हे केवळ अग्नीचे सहाय्य असेल, तर घडेल.
.
वा-याने, किंवा पाण्याने जेव्हा दिव्याचा प्रकाश नाहीसा होतो, तेव्हा शाबूत असलेली आपली दृष्टी कशी पाहू शकेल..देह पडण्याच्या वेळी होणा-या त्रिदोषाने देह आतबाहेर कफाने व्यापला जातो, त्यावेळी अग्नीचे तेज निघून जाते.त्यावेळी प्राणास क्रियाशक्ती नसते, त्यामुळे चेतना टिकत नाही.मग स्वसरुपस्थितीची आठवण थांबली. म्हणजे ज्याप्रमाणे ठेवलेली वस्तू पाहण्याकरता हातात घेतलेला दिवा , ती वस्तू दिसण्यापूर्वीच मालवून जावा, त्याप्रमाणे जो जन्मभर अभ्यास केला, तो मरण येण्याच्या पूर्वीच नाहीसा झाला.....म्हणजे ज्ञानाला मूळ कारण अग्नी आहे. त्या अग्नीचे मरणकाळी पूर्ण बळ असावे.
देहात अग्नीचा व ज्योतीचा प्रकाश असून बाहेर शुक्लपक्ष, दिवस, आणि उत्तरायणातील सहा महिन्यांपैकी एक महिना अशा या चांगल्या जुळून आलेल्या योगाची प्राप्ती होऊन , जे योगी आपला देह सोडतात, ते ब्रह्मवेत्ते परब्रह्म होतात.हा उत्तम काळ आहे. याला अर्चिरादि मार्ग म्हणावे. तो सहज कल्याणकारक असून मोक्षाची प्राप्ती करून देण्यास चांगला आहे.
अर्चिरादि किंवा ज्योतिरादि मार्ग हा आरंभापासून अखेरपर्यंत उजेडाचा आहे. ज्ञान हे प्रकाशमय व परब्रह्म हे ज्योतिषां ज्योतिः म्हणजेच तेजाचे तेज असल्यामुळे देहपातानंतर ज्ञानी पुरुषांचा मार्ग प्रकाशमय असणारच....!
.
(सौ.शैलजा शेवडे)
.
(आजच्या लोकमतमधील अध्यात्मिक सदरातील माझा मूळ लेख )

Comments