अखंड चिंतन रामकथेचे
अखंड चिंतन रामकथेचे, असते निज अंतरी,
असेल का मग, अंजनीनंदन जवळी कोठेतरी ?
.
रामघोष तो चाले जेथे, वायुरूपे जाई तेथे,
सूक्ष्मरूपाने वास करतो, रामभक्तां घरी |
.
भक्तांचा तो असे सारथी, रामहृदयानंद मारुती,
उपासनेचा मार्ग दाखवी,अथांग करुणा उरी ..|
.
रामभक्तीची सुंदर लाट, उचंबळोनी ये हृदयात,
रामदूत हनुमंतच हर्षे, नेईल पैलतीरी |
.
नितांतशरणागत हा भाव, रामभक्तीचा सुंदर गाव,
कैवारी हनुमान असे तर, शंका राही दुरी |
.
.
(सौ. शैलजा शेवडे)

Comments