रामकथा गाता गातांना
रामकथा गाता गातांना, मिळतो आत्माराम,
अंतर्यामी राम जपता, प्रकटे आत्माराम |
.
सगुणाराधना निर्गुणाची, संकल्पना सत्याची,
चिदानंद वत्सलतेने, युक्त अशा ब्रह्माची,
राम म्हणा हो,राम म्हणा, आनंदाचे धाम,
अंतर्यामी राम जपता, प्रकटे आत्माराम |
.
ध्यान करावे रघुरायाचे, जानकीजीवन रामाचे,
मर्यादापुरुषोत्तम योद्ध्या, महापराक्रमी रामाचे,
धाक ज्याचा काळालाही, आश्वासक ते नाम,
अंतर्यामी राम जपता, प्रकटे आत्माराम |
.
कथासुधेच्या नित्यसेवने, विशुद्ध भक्तीभाव,
कोमल निर्मळ अंतरात मग, जागे ब्रह्मज्ञान,
राम इथे, हो राम तिथे, रामाविण ना धाम,
अंतर्यामी राम जपता, प्रकटे आत्माराम |
.
.
(सौ.शैलजा शेवडे)

Comments