रंगलेल्या मैफिलीची

रंगलेल्या मैफिलीची, ती त-हा मज न्यारी होती,
मी दिलेली वेदना तुज, मजहूनीही प्यारी होती.
वाहव्वा जल्लोष होता, शब्दशब्दा दाद होती,
न जाणे कोणत्या सुरेने झिंगलेली सारी होती |
.
मी दिलेल्या आसवांचे, शब्दमोती होत होते,
बाजारी अन मैफिलीच्या, लिलाव त्यांचे होत होते,
शुष्क डोळ्यांनी उभी,गर्दीतली मी एक होते,
गणगोत ते तुजभोवती, दुर्लक्षित मी होत होते |
.
ती क्षणांची भूल होती, मृगजळाची हूल होती,
प्राक्तनाने घेतलेली एक फसवी झूल होती,
झेपावणा-या वादळाची, ती एक चाहूल होती,
भाबड्या डोळ्यात माझ्या, फेकलेली धूळ होती |

होष घेऊनी, जाण्या तुझा, वेदनेची साकी होती,
ज्ञात ते नव्हते तुला पण, ती कहाणी बाकी होती,
रिक्त ओंजळीत माझ्या आसवांची ओल होती,
कैफियत माझी परी ती, माझ्यापरी एकाकी होती |

Comments

Popular posts from this blog

मन गोकुळ हे

कसा आहे गं तो?