रक्षण कर हे, दयाघना रे, तूच तूच रे त्राता ।

वज्राघातच, मेघ गरजती,
कडकड कडकड वीजा चमकती,
अती भयंकर वादळवारे,
संतत धारे, जर्जर सारे,
कृष्णा कृष्णा, भक्तवत्सला, गोकुळीच्या नाथा,
रक्षण कर हे, दयाघना रे, तूच तूच रे त्राता ।
...
कोसळणा-या या जलधारा,
गारपीटी करी उन्मत वारा,
बुडूनी गेली, घरे नी दारे,
कुडकुडती ही गाई वासरे,
चरणी तुझिया आलो हरी रे, गोकुळीच्या नाथा,
रक्षण कर हे, दयाघना रे, तूच तूच रे त्राता ।

बुडू लागली सारी अवनी,
जिकडे तिकडे पाणी पाणी,
काय करावे, जावे कोठे,
प्रलयकाळ तो आला वाटे,
इंद्र कोपला, तूच समर्था, गोकुळीच्या नाथा,
रक्षण कर हे, दयाघना रे, तूच तूच रे त्राता ।

(सौ. शैलजा शेवडे)

Comments

Popular posts from this blog

मन गोकुळ हे

कसा आहे गं तो?