दामोदराष्टक अनुवाद
कार्तिक मासाला दामोदर मासही म्हणतात. काल कार्तिक मास संपला.. काही निमित्त झालं, आणि माझ्या मनात दामोदराष्टक घोळू लागलं. पूर्वी मी दामोदराष्टकाच्या ४ कडव्यांचा काव्यानुवाद केला होता. राहिलेल्या ४ कडव्यांचा अनुवाद करण्याचा प्रयत्न ४ दिवस चालू होता. प्रत्येक क्षणी केवळ दामोदराष्टक डोक्यात ... ! मजा म्हणजे आता मला कळलं, कार्तिक मासात दामोदराष्टक रोज म्हणतात..खरोखर प्रभुची लीला अगाध आहे.
शिशुरूप ज्याचे लुभावे मनाला,
कसा धावतोहे, झुला कुंडलाला
यशोदा बळेही धरी बालकाला ...
नमस्कार माझा तया ईश्वराला,
शिशुरूप ज्याचे लुभावे मनाला,
कसा धावतोहे, झुला कुंडलाला
यशोदा बळेही धरी बालकाला ...
नमस्कार माझा तया ईश्वराला,
रडे, घाबरूनी, पुन्हा नेत्र चोळे,
किती सानुल्याला येती उमाळे,
गळा मोतीयांची कशी माळ हाले,
अहा भक्तीने, दामोदरा बांधियेले ।
अती आनंद देत या बाललीला
जणू तो इशारा, ज्ञानी जना्ला,
पहा, जिंकते प्रेम दामोदराला.
नमस्कार माझा तया ईश्वराला ।
नको मोक्ष, मुक्ती, नसे कामना ही,
न वैकुंठ प्राप्ती, नको अन्य काही,
रहा बालरूपे, हृदयात माझ्या,
असे हीच इच्छा, असे प्रार्थनाही ।
तुझे सावळे मुख गोजिरवाणे,
मऊ रेशमी, कुंतले वेढिलेले,
यशोदेकडूनी, किती चुम्बिले जे,
वसावे मनी ते,नको काही दूजे ।
नमस्कार दामोदरा हे अनंता,
प्रभो हो प्रसन्ना, कृपावंत दाता,
भवाच्या समुद्री, बुडू लागलो मी,
दयेच्या घना, धाव रे, धाव आता ।
जरी बांधलेले तुला ऊखळाला,
तरी मुक्त केले, कुबेरात्मजांना,
तशी तीच भक्तीच, दामोदरा दे,
नको मोक्ष तो, प्रेमभक्तीच दे रे ।
नमस्कार त्या उदर रज्जुपाशा,
मुलाधार, ब्रह्मांड तेजा प्रकाशा,
नमस्कार माझा तयाच्या लिलेला,
नमस्कार राधेस, दामोदराला ।
(सौ. शैलजा शेवडे)
किती सानुल्याला येती उमाळे,
गळा मोतीयांची कशी माळ हाले,
अहा भक्तीने, दामोदरा बांधियेले ।
अती आनंद देत या बाललीला
जणू तो इशारा, ज्ञानी जना्ला,
पहा, जिंकते प्रेम दामोदराला.
नमस्कार माझा तया ईश्वराला ।
नको मोक्ष, मुक्ती, नसे कामना ही,
न वैकुंठ प्राप्ती, नको अन्य काही,
रहा बालरूपे, हृदयात माझ्या,
असे हीच इच्छा, असे प्रार्थनाही ।
तुझे सावळे मुख गोजिरवाणे,
मऊ रेशमी, कुंतले वेढिलेले,
यशोदेकडूनी, किती चुम्बिले जे,
वसावे मनी ते,नको काही दूजे ।
नमस्कार दामोदरा हे अनंता,
प्रभो हो प्रसन्ना, कृपावंत दाता,
भवाच्या समुद्री, बुडू लागलो मी,
दयेच्या घना, धाव रे, धाव आता ।
जरी बांधलेले तुला ऊखळाला,
तरी मुक्त केले, कुबेरात्मजांना,
तशी तीच भक्तीच, दामोदरा दे,
नको मोक्ष तो, प्रेमभक्तीच दे रे ।
नमस्कार त्या उदर रज्जुपाशा,
मुलाधार, ब्रह्मांड तेजा प्रकाशा,
नमस्कार माझा तयाच्या लिलेला,
नमस्कार राधेस, दामोदराला ।
(सौ. शैलजा शेवडे)
Comments