रस्ता...न घेतलेला
द्विधा मनःस्थिती असली, आपल्यापुढे दोन पर्याय असतील, दोन्ही सारखेच तोलामोलाचे असतील, पण आपल्याला एकच मार्ग निवडायचा आहे, तेव्हा कसं वाटतं ना? मन अगदी गोंधळून जातं...! त्यातल्या त्यात बरा मार्ग कोणता, हे ठरवत बसतो...आणि मग तो मार्ग निवडला, त्यामुळे हे असं झालं, अशी मखलाशी करत बसतो.. स्वतःच्या मनाला समजावत बसतो. लोकांना सांगत बसतो. रॉबर्ट फ्रॉस्ट यांची एक कविता, The Road Not Taken' या कवितेत हे छान बघायला मिळते. ही कविता खरोखरच अवघड आहे..कविला काय सांगायचं आहे, हे पटकन कळतच नाही.... मी माझ्या परिने काढलेला अर्थ...या कवितेचा काव्यानुवाद.
मूळ कविता,
The Road Not Taken
(Robert Frost, 1874 - 1963 )
.
Two roads diverged in a yellow wood,
And sorry I could not travel both
And be one traveler, long I stood
And looked down one as far as I could
To where it bent in the undergrowth;
Then took the other, as just as fair,
And having perhaps the better claim,
Because it was grassy and wanted wear;
Though as for that the passing there
Had worn them really about the same,
And both that morning equally lay
In leaves no step had trodden black.
Oh, I kept the first for another day!
Yet knowing how way leads on to way,
I doubted if I should ever come back.
I shall be telling this with a sigh
Somewhere ages and ages hence:
Two roads diverged in a wood, and I--
I took the one less traveled by,
And that has made all the difference.
दोन रस्ते फाकलेले, सोनपिवळ्या जंगली या,
एक मी अन दोन रस्ते, कोणता तो, आपलावा?
संभ्रमाने थांबलो मी, वेध पुन्हा घेतला तो,
जंगली या दोन रस्ते, कोणता वळतो, कुठे तो ।
दोन ही ते सारखे पण, घेतला दुसराच रस्ता,
छान तो गवताळ रस्ता, बोलवी मज तोच रस्ता ।
रुळविलेले ते जरीही, पावलांनी सारखेची,
आवडे दुसराच रस्ता, का मनाला तोच खेची ।
त्या सकाळी दोनही ते, सारखेची शांत रस्ते,
ना कुणी तुडवून पाने, काळवंडुन टाकले ते ।
राखला मी मार्ग पहिला, यायला केव्हा तरी ते,
ठावके देवास, वळणे, परतणे होई कधी ते ।
खूप वर्षांनी कधी मग, आणि जागी कोठल्याशा,
मी जगा सांगेन तेव्हा, दीर्घ सोडूनी उसासा,
’आत जाता जंगलाच्या, मार्ग फुटले दोन ते अन,
जो न रुळला, घेतला मी, त्यामुळे हे वेगळेपण ।
काव्यानुवाद, सौ. शैलजा शेवडे
The Road Not Taken
(Robert Frost, 1874 - 1963 )
.
Two roads diverged in a yellow wood,
And sorry I could not travel both
And be one traveler, long I stood
And looked down one as far as I could
To where it bent in the undergrowth;
Then took the other, as just as fair,
And having perhaps the better claim,
Because it was grassy and wanted wear;
Though as for that the passing there
Had worn them really about the same,
And both that morning equally lay
In leaves no step had trodden black.
Oh, I kept the first for another day!
Yet knowing how way leads on to way,
I doubted if I should ever come back.
I shall be telling this with a sigh
Somewhere ages and ages hence:
Two roads diverged in a wood, and I--
I took the one less traveled by,
And that has made all the difference.
दोन रस्ते फाकलेले, सोनपिवळ्या जंगली या,
एक मी अन दोन रस्ते, कोणता तो, आपलावा?
संभ्रमाने थांबलो मी, वेध पुन्हा घेतला तो,
जंगली या दोन रस्ते, कोणता वळतो, कुठे तो ।
दोन ही ते सारखे पण, घेतला दुसराच रस्ता,
छान तो गवताळ रस्ता, बोलवी मज तोच रस्ता ।
रुळविलेले ते जरीही, पावलांनी सारखेची,
आवडे दुसराच रस्ता, का मनाला तोच खेची ।
त्या सकाळी दोनही ते, सारखेची शांत रस्ते,
ना कुणी तुडवून पाने, काळवंडुन टाकले ते ।
राखला मी मार्ग पहिला, यायला केव्हा तरी ते,
ठावके देवास, वळणे, परतणे होई कधी ते ।
खूप वर्षांनी कधी मग, आणि जागी कोठल्याशा,
मी जगा सांगेन तेव्हा, दीर्घ सोडूनी उसासा,
’आत जाता जंगलाच्या, मार्ग फुटले दोन ते अन,
जो न रुळला, घेतला मी, त्यामुळे हे वेगळेपण ।
काव्यानुवाद, सौ. शैलजा शेवडे
Comments