बघ कालिया होऊन फुत्कारते मी,
भयभीत डोहास साकारते मी,
वृन्दावनीचा प्राण, हो, सखी गं,,
साकार कर अन कालिया मर्दना ।
...
कधी बन तू कान्हा, कधी ही कान्हा,
चला खेळू या खेळ, कान्हा गं कान्हा,
विसरून जाऊ, जगा, देहभाना,
चला नाचू या नाच, कान्हा गं कान्हा ।
( सौ. शैलजा शेवडे )
See More
  • Shailaja Shevade कृष्णाच्या विरहाने दुःखी झालेल्या गोपी कृष्णाला सतत आठवू लागल्या. नृत्यात त्याच्या लीला करून मन रमवू लागल्या.

    पहा ती गिरीधर, बने गोपबाला,

    करांगुलीवरी तोली, जणु पर्वताला,
    व्रजवासी जना त्या स्मरू या मना,
    नंदनंदनाला अन करु वंदना ।

    अहा ती गोपी, बघा कृष्ण झाली,
    चला होऊ या, सावळ्याची सावली,
    करू रासलीला, करू मुक्तगाना,
    आनंद आनंद, अरण्या वना ।

    कृष्णा तुझ्यावीण, काही सुचेना,
    तू नाही इथे हे, मना साहवेना,
    तुझ्या ध्यानी बघ काळही गोठला हा,
    कान्हा तुला आठवू, पुन्हा रे पुन्हा ।

    (सौ. शैलजा शेवडे)

    भागवताच्या आधाराने केलेली कविता

Comments

Popular posts from this blog

मन गोकुळ हे

कसा आहे गं तो?