डोळ्यात ये पुन्हा ती

कासाविशी मनी का, आंदोलने पुन्हा ती,
आली कशी समोरी, त्याची छबी पुन्हा ती ।

जी कोवळी सुरावट, शब्दात बांधली मी,
होऊन का तराणा, ओठावरी पुन्हा ती ।

डोहातल्या तळाशी, दडली किती रहस्ये,
साकारली तरंगी, दिसतात का पुन्हा ती ।

कोणी उनाड पक्षी, बागेत घे लकेरी,
थबकून शोध घेती, का पावले पुन्हा ती ।

आकाश मेघओले, वारा सुसाट धावे,
जाणीव पावसाळी, डोळ्यात ये पुन्हा ती ।

(सौ. शैलजा शेवडे)

Comments

Popular posts from this blog

मन गोकुळ हे

कसा आहे गं तो?