वंदन वंदन मोक्षप्रदा
प्रथम तुला नमितो, स्मरतो, गणराज गजानन विघ्नहरा,
भवभयतारक हे गणनायक संकटनाशक सौख्यकरा ।
सकलचराचर व्यापक, धारक पालक पोषक पाशधरा,
कणकण होत विलीन तुझ्यात, फिरून तुझ्यातुन जन्म खरा ।
सगुण कुणी तुजला म्हणती, पुजती, भजती, व्रत आचरती,
गजवदना तव रूप मनोहर, रेखित मानस तोषवती ।
प्रमथपते अति गूढ अनादि अपार गुणेश तुला वदती,
प्रणवरुपात तुला बघती, तरती भवसागर अल्पमती ।
तगमग ही हृदयात क्षणोक्षण जाण दयाघन श्रीवरदा,
पदकमलावर जीवन अर्पण, दे मज दर्शन शांतिप्रदा ।
गजमुख श्रीगणनायक तारक ध्यास तुझा मज भास सदा,
अविरत चिंतन ध्यान गजानन वंदन वंदन मोक्षप्रदा ।
( सौ. शैलजा शेवडे )

Comments