मी तृषार्तच अजूनही ।

इच्छिले जे, प्राप्त झाले, आणि थोडे अजुनही

का तरी मन आर्त आहे, काय मागे अजुनही?

वाचली पोथ्या पुराणे, चाळिले ते ग्रंथही,

थांग या अंतर्मनाचा, नाहि लागे अजुनही ।

हा मुळी चकवाच लागे,  कठिण आहे मानणे,

फिरफिरूनी शोधिते मी, हरवल्या मज अजुनही ।

गालिचा माझ्याचसाठी, हा फुलांचा घातला,
 पाकळ्या, रुततात का त्या,  हेच कोडे अजूनही ।


आणला वसुदेव पेला, तो सुखाचा भरुनिया,

ओष्ठस्पर्शे रिक्त होतो,  मी तृषार्तच अजूनही ।

कवयित्री: सौ. शैलजा शेवडे

Comments

Popular posts from this blog

मन गोकुळ हे

कसा आहे गं तो?