’मी’ पणाची गाठ ही..
वेढुनी राहे जिवाला, ’मी’ पणाची गाठ ही,
सोडिता ही ना सुटेना, ’मी’ पणाची गाठ ही ।
डोकवे कोठून कैसी, बोलतांना जाणवे,
पाडिते, तोंडावरी का, ’मी’ पणाची गाठ ही ।
घोकली, ती तर्कशास्त्रे, मोहमायेचा तिढा,
नाहिशी झाली मुळी ना, ’मी’ पणाची गाठ ही ।
जायचे आहे जिथे ते, ध्येय गाठावे कसे,
गुंतलेली वाट सांगे, ’मी’ पणाची गाठ ही ।
का मनाला मोह पाडे, आत्मश्लाघ्या, बोलणे,
पाय आहे मातीचे हे, ’मी’ पणाची गाठ ही ।
( सौ. शैलजा शेवडे)
सोडिता ही ना सुटेना, ’मी’ पणाची गाठ ही ।
डोकवे कोठून कैसी, बोलतांना जाणवे,
पाडिते, तोंडावरी का, ’मी’ पणाची गाठ ही ।
घोकली, ती तर्कशास्त्रे, मोहमायेचा तिढा,
नाहिशी झाली मुळी ना, ’मी’ पणाची गाठ ही ।
जायचे आहे जिथे ते, ध्येय गाठावे कसे,
गुंतलेली वाट सांगे, ’मी’ पणाची गाठ ही ।
का मनाला मोह पाडे, आत्मश्लाघ्या, बोलणे,
पाय आहे मातीचे हे, ’मी’ पणाची गाठ ही ।
( सौ. शैलजा शेवडे)
Comments