घटाघटामध्ये राम विराजे
प्रतीकांमध्ये किती अडकसी, ठोठवसी रे, किती दरवाजे,
समजेल कधी तुज, खुळ्या मना रे, घटाघटामध्ये, राम विराजे ।
राघववेळी, शकुनसावली, वा-यासंगे घुंगुर वाजे,
सावध होऊन ऐक जरा रे, घटाघटामध्ये, राम विराजे ।
शब्दारण्यी चकवा लागे, भटकत फिरता, पाऊल भाजे,
शोध तुझा हा व्यर्थ असे रे, घटाघटामध्ये, राम विराजे ।
बुध्दी तुझी ती चालत नाही, मान्य कराया मन हे लाजे,
अहंपणावीण विचार कर रे, घटाघटामध्ये, राम विराजे ।
जाणून घे रे, राम कसा तो, शब्दातील तो अर्थच साजे,
इथे राम, तो, तिथे राम रे, घटाघटातून राम विराजे ।
(सौ. शैलजा शेवडे)

Comments