काय त्याचे नाव आहे?
जीवनाने टाकलेला, कोणता हा डाव आहे,
दो घडी मुक्काम की हे, पोचण्याचे गाव आहे?
वादळी रात्रीत होती, नाव माझी मोडलेली,
हा किनारा सत्य का ही, स्वप्न वेडी धाव आहे?
घोकती मंत्रास कोणी, आणि कोणी बांग देई,
सर्व जो व्यापून राहे, काय त्याचे नाव आहे?
जागलेले गूढ काही, आज माझ्या अंतरी जे,
साथ त्याची मागते मी, हा हवासा घाव आहे ।
तोडण्या मी सिध्द झाले, शृंखला या घातलेल्या,
जाणवे त्याला कधी का, कोवळा जो भाव आहे ।
(सौ. शैलजा शेवडे)

Comments