कालची माझी छबी ती,

कालची माझी छबी ती, आरशा गेली कुठे?
कोणत्या कोनात पाहू, सांग ना, गेली कुठे?

राधिका ओठास लावी, मोहनाची बासरी,
काळजाशी गुंफलेली, ती कथा गेली कुठे?

कोवळी होती कळी जी, फूल होता लाजली
हाय ती नाही इथे रे, वादळा, गेली कुठे?

जि्द्द होती जिंकण्याची, त्या किना-या, शांतशा,
लाट जी झेपावली ती, सागरा, गेली कुठे?

सोनचाफ्याची अबोली, गंधवेडी बावरी,
एक होती रे किशोरी, जीवना, गेली कुठे?

(सौ. शैलजा शेवडे)

Comments

Popular posts from this blog

मन गोकुळ हे

कसा आहे गं तो?