भज गोविंद, भज गोविंद.....

भ्रमित जीवा रे, जाणून घे तू, जगण्याची ती असे कला,
शिशिरामागून वसंत येतो, नवा गंध त्या नव्या फुला ।

गोविंदा’शी’, गोविंदा’स्तव’, गोविंदा’चे’, सर्व असे,
विभक्तीप्रत्यय हेच जोडीता, कळीकाळाची भीती नसे ।

अग्नी भाजतो, सूर्य पोळतो, किती संकटे, किती अडचणी,
उभा राहीन परी , पाय रोवूनी, जगण्याची धर जिद्द मनी ।

शरीर माझे, पूजासाधन, परमात्म्याचे करण्या पूजन,
म्हणून त्यावर लोभ असे, अन्य कोणता भाव नसे ।

जन्ममृत्युचे, चक्र हवेसे, मुक्तीमोक्ष, मज नकोनकोसे,
पुन्हा पुन्हा मी जन्मा यावे, गोविंदाचे चरण भजावे ।

(सौ. शैलजा शेवडे)

Comments

Popular posts from this blog

मन गोकुळ हे

कसा आहे गं तो?