कुब्जा
मंत्र न जाणे, तंत्र न जाणे,
पूजाविधीही, काही न जाणे,
एक समर्पित भावच केवळ,
वसे माझ्या उरी,
श्रीहरी, चला माझ्या घरी ।
मी कंसाची कोणी दासी,
कुब्जा म्हणती, या देहासी,
उपहासाने कोणी म्हणती,
त्रिवक्रा सुंदरी..
श्रीहरी, चला माझ्या घरी।
चंदन उटी तुम्हा लावता,
या हातांना मिळे धन्यता,
श्यामसुंदरा, तुम्हीच दैवत,
पटे खूण अंतरी,
श्रीहरी, चला माझ्या घरी ।
दिव्य स्पर्श हो, तुमचा होता,
गेली वक्रता, ये सरलता,
दाटून आले, नेत्र आणखी,
शिरशिरी देहावरी,
श्रीहरी, चला माझ्या घरी ।
पूजासाधन, माझे 'मीपण',
तुम्ही दिलेले, हे सुंदर तन,
दयाघना, श्रीधरा, अच्युता,
अर्पिते चरणावरी,
श्रीहरी, चला माझ्या घरी ।
(सौ. शैलजा शेवडे)
पूजाविधीही, काही न जाणे,
एक समर्पित भावच केवळ,
वसे माझ्या उरी,
श्रीहरी, चला माझ्या घरी ।
मी कंसाची कोणी दासी,
कुब्जा म्हणती, या देहासी,
उपहासाने कोणी म्हणती,
त्रिवक्रा सुंदरी..
श्रीहरी, चला माझ्या घरी।
चंदन उटी तुम्हा लावता,
या हातांना मिळे धन्यता,
श्यामसुंदरा, तुम्हीच दैवत,
पटे खूण अंतरी,
श्रीहरी, चला माझ्या घरी ।
दिव्य स्पर्श हो, तुमचा होता,
गेली वक्रता, ये सरलता,
दाटून आले, नेत्र आणखी,
शिरशिरी देहावरी,
श्रीहरी, चला माझ्या घरी ।
पूजासाधन, माझे 'मीपण',
तुम्ही दिलेले, हे सुंदर तन,
दयाघना, श्रीधरा, अच्युता,
अर्पिते चरणावरी,
श्रीहरी, चला माझ्या घरी ।
(सौ. शैलजा शेवडे)
Comments