ते कोवळे कव

ते कोवळे कवडसे, दिपवून नेत्र गेले,
अंदाज बांधलेले, चुकवून मात्र गेले.
अंधारल्या मनाला, आधार एक होता,
ते खेळ सावल्यांचे, देऊन रात्र गेले ।

खोटीच होती त्याची, ग्वाही खुल्या जगाची,
आकाश पेलणा-या, बेधुंद पाखराची,
आसावल्या मनाने, स्वप्ने किती पहावी,
अंधार भेदणा-या, तेजाळल्या रवीची ।

उसने क्षणिक होते, उजळून सर्व जाणे,
काळोख घोर आता, टिटवीच गाई गाणे.
वटवाघळे कुठुनी, शोधीत आली फांदी,
टांगुनी घेती उलटी, सारेच दैन्यवाणे ।

(सौ. शैलजा शेवडे)

Comments

vijay said…
Kharach khup chan kavya ahe ...mala avadale ...kase suchte ...kay kalat nahi..............mind blowing !!!!!

Popular posts from this blog

मन गोकुळ हे

कसा आहे गं तो?