मी मुक्त बेभान गान...
मी मुक्त बेभान गान,हे सत्य तू जाण,
किनारा धरून वाहण्याची सक्ती ही कुठली?
घालू नकोस आण, जीव हैराण,
विनविते सख्या रे आधी म्हण,'सुटली!'
गुंतू नकोस म्हणतोस,फेकितोस,खुशाल हे जाळे,
गुरफटता ओढतोस,जवळ घेतोस,कसले हे चाळे?
हासू नकोस आज,जीव नाराज,त्यात ही लाज,
सांगते पुन्हा मी, खूण जीवाला पटली,
घालू नकोस आण, जीव हैराण
विनविते सख्या रे आधी म्हण,'सुटली!' ।१।
मी नाचरी वीज, गगनतेज, कल्लोळूनी उठले,
ते मेघ कडाडती, पुन्हा गर्जती, क्रोधित किती झाले,
होऊ दे तुफान, खाक हे रान,
तरी संगत ना सुटली,
घालू नकोस आण , जीव हैराण,
विनविते सख्या रे, आधी म्हण ’सुटली’ ।२।
(सौ. शैलजा शेवडे)
किनारा धरून वाहण्याची सक्ती ही कुठली?
घालू नकोस आण, जीव हैराण,
विनविते सख्या रे आधी म्हण,'सुटली!'
गुंतू नकोस म्हणतोस,फेकितोस,खुशाल हे जाळे,
गुरफटता ओढतोस,जवळ घेतोस,कसले हे चाळे?
हासू नकोस आज,जीव नाराज,त्यात ही लाज,
सांगते पुन्हा मी, खूण जीवाला पटली,
घालू नकोस आण, जीव हैराण
विनविते सख्या रे आधी म्हण,'सुटली!' ।१।
मी नाचरी वीज, गगनतेज, कल्लोळूनी उठले,
ते मेघ कडाडती, पुन्हा गर्जती, क्रोधित किती झाले,
होऊ दे तुफान, खाक हे रान,
तरी संगत ना सुटली,
घालू नकोस आण , जीव हैराण,
विनविते सख्या रे, आधी म्हण ’सुटली’ ।२।
(सौ. शैलजा शेवडे)
Comments